Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : अत्यावश्यक सेवांना हवी वेळेची मर्यादा; नागरीकांची मागणी

फैजपूर प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. मात्र अत्यावश्यक सेवा या लॉकडाऊन मधून वळगण्यात आले असल्याने नागरिक अत्यावश्यक सेवेच्या कारणाने विनाकारण घराच्या बाहेर पडून शहरात फिरतांना दिसत आहे. या अत्यावश्यक सेवांना वेळीची मर्यादा ठरवुन देण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहे.

संपूर्ण देश कोरोना संसर्गजन्य आजाराने त्रासाला आहे. यातच 21 दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय असतांना सुद्धा नागरिक विनाकारनाणे अत्यावश्यक सेवाचे कारण सांगून रोज शहरात फेरफटका मारत आहे. नागरिकांना पुढे प्रशासन देखील हतबल झाले आहे नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत दिसून येत नाही. जर एखादा रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह सापडला ? तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते हे फैजपूर कारांना कळून न कळल्या सारखे करीत आहे. जे व्यावसायिक अत्यावश्यक सेवेममध्ये येत नाही अश्यांची पण काही दुकाने उघडी असल्याचे दिसून येत आहे. यासाठी प्रशासनाने अत्यावश्यक सेवांना वेळेची मर्यादा पाळून देण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरीक करीत आहे.

डॉक्टरांची फाईल दाखवून पेट्रोल घेता
पेट्रोल चालकांना अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही पेट्रोल देण्यात येऊ नये असे आदेश आहे. मात्र नागरिकांनी त्यावर नवीन शक्कल लढवली जात आहे. डॉक्टरांची फाईल सांगून अनेक नागरिक दुचाकी व चार चाकित पेट्रोल डिझेल टाकून घेत आहे. यातच जिल्हाधिकारी यांना केळीच्या वाहनासाठी डिझेल मिळेल असे आदेश दिले आहे केळी वाहनसाठी दिसेल नागरिक घेऊन जात आहे. या पेट्रोल व डिझेल विक्रीवर प्रशासनाने तोडगा काढावा विनाकारण नागरिक पेट्रोल व डिझेल घेणार नाही.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version