कोरोनास हद्दपार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करा — डॉ. बऱ्हाटे

 

यावल, प्रतिनीधी  ।  राज्यात कोवीड १९ च्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.  यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर एक मोठे आव्हानच उभे राहिलेले असून नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून कोरोनास हद्दपार करण्यास सहकार्य करावे असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत  बऱ्हाटे यांनी केले. 

तालुक्यातील मनवेल गावातील ग्रामपंचायत कार्यलयात नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांची तातडीने आयोजित करण्यात आलेल्या सयुक्त बैठकीत डॉ. हेमंत बऱ्हाटे बोलत होते. या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते,  लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी डॉ. बऱ्हाटेयांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बद्दल मार्गदर्शन केले. विवाह सोहळा, अंत्ययांत्रा व सार्वजनिक ठिकाणी जास्त गर्दी ठिकाणी मास्क वापरणे. सुरक्षित अंतर ठेवणे यासह कोरोनाबाबत मार्गदर्शन केले.  याप्रसंगी सरपंच जयसिंग सोनवणे,  उपसरपंच मिनाक्ष्री पाटील, ग्रामपंचायत सदस्यं ,डॉ. अस्मा तडवी, आरोग्य सेवक राजेश्वर निकुंभ, ग्रामसेवक भरत पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content