Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोनासह कोकणात माकडतापाची दहशत ; दोघांचा मृत्यू

मुंबई (वृत्तसंस्था) संपूर्ण जगासह राज्यामध्ये करोनाची दहशत पसरलेली असतानाच माकडताप या आजारामुळे कोकणात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

 

डेगवे – मोयझरवाडी येथील दिनेश देसाई यांचा तापाचा वैद्यकीय अहवाल माकडताप पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर त्यांना दि. ८ फेब्रुवारी रोजी त्यांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात साधारण गेले दीड महिने त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा होत नव्हती. अखेर मंगळवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. पंधरा दिवसांपूर्वी पडवे माजगाव येथील लक्ष्मण शिंदे यांचा माकडतापाने मृत्यू झाला होता. आतापर्यंत माकडताप पॉझिटीव्ह तीन रुग्ण बांबोळीत उपचारासाठी दाखल झाले असून पैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तिसरा रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. दरम्यान, ३ वर्षांपूर्वी बांदा परिसरात माकडतापाने धुमाकूळ घातला होता. या तापाने बांदा शहरातील सटमटवाडी व परिसरातील गावांमधील १५ हुन अधिक जणांचे बळी घेतले होते. त्यामुळे दरवर्षी आरोग्य विभागाच्या वतीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या १४ गावांमध्ये माकडताप प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येते.

Exit mobile version