Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोनावर मात केलेल्या रुग्णाला हिरव्या बुरशीचा संसर्ग : देशातील पहिला रुग्ण

 

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । कोरोनावर मात केलेल्या ३४ वर्षीय रुग्णाला हिरव्या बुरशीची लागण  आहे. इंदूरमधील या रुग्णाला उपचारासाठी एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात आलं असल्याची माहिती वरिष्ठ डॉक्टरांनी दिली

 

आपल्याला म्युकरमायकोसिसचा (काळी बुरशी) संसर्ग झाल्याची भीती असल्याने रुग्णाने चाचणी केली असताना ही माहिती समोर आली.

 

अरबिंदो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या   छातीच्या आजार विभागाचे प्रमुख डॉक्टर रवी दोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हा रुग्ण कोरोनामधून बरा झाला होता. दरम्यान त्याला आपल्याला म्युकरमायकोसिसची लागण झाल्याच संशय आला. यामुळे त्याने चाचणी केली असता याउलट फुफ्फुस, रक्तात हिरव्या बुरशीचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं”.

 

कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये असणारा हिरवी बुरशी संसर्गाचा प्रकार इतर रुग्णांच्या तुलनेत वेगळा आहे का यावर संशोधनाची गरज असल्याचं डॉक्टर रवी दोशी यांनी म्हटलं आहे.

 

या रुग्णाला दोन महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. फुफ्फुसात १०० टक्के कोरोना संसर्ग झाला असल्याने जवळपास एक महिना त्यांना आयसीयूत ठेवण्यात आलं होतं. पण  बरं झाल्यानंतर त्यांच्या नाकातून रक्त वाहत होतं   खूप ताप येत होता. वजन कमी झाल्याने त्यांना अशक्तपणाही आला होता अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

 

हिरव्या बुरशीचा संसर्ग झाल्याची ही देशातील पहिलीच केस असण्याची शक्यता आहे. दरम्यान रुग्णाला सध्या मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत.

 

Exit mobile version