कोरोनामृतांची हेळसांड नको , अन्यथा आंदोलन – डॉ. विवेक सोनवणे

 

मुक्ताईनगर, प्रतिनिधी । कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींना योग्य पद्धतीने स्मशानभूमीत आणा, अन्यथा तीव्र आंदोलन प्रहार  संघटनेच्यावतीने करण्यात येईल, असा इशारा डॉक्टर विवेक सोनवणे यांनी दिला आहे.

 

उपजिल्हा रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्या रुग्णांना अंत्यविधीसाठी स्मशानभूमीपर्यंत नेण्यास शववाहिका नसल्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना प्रशासकीय अनास्थेमुळे अंत्यविधी करण्यास तासनतास तातकळत रहावे लागते, संबंधित पीडितांच्या तक्रारीनुसार नगरपंचायतकडून अंत्यविधीसाठी आलेले कर्मचारी कचरागाडी घेऊन मृतदेह घेण्यास  आलेले असतात ही माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट असून मृतदेहाची घोर विटंबना आहे.

 

उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाला विचारणा केली असता, मृतदेह स्मशानभूमिपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची आहे असे सांगण्यात आले आहे. नगरपंचायत प्रशासनाला विचारणा केली असता, उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले. शववाहिका कचरा गाडी असली म्हणून काय झाले आम्ही त्या गाडीचे निर्जंतुकीकरण करतो असे सांगण्यात आले. संबंधित पिडीत परिवार मृतदेह गाडीत न जावू देता उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी रुग्णवाहिकामध्ये घेऊन जातात व सदर रुग्णवाहिका चालक त्यासाठी १ हजार रुपयांची मागणी करून त्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत रुग्ण वाहिका हीच शववाहिका असे चित्र उपजिल्हा रुग्णालयात दिसून येत आहे. यामागे नगरपंचायत प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची  अंत्यविधी करणाऱ्या ठेकेदारांसोबत आर्थिक भागीदारी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासन अंत्यविधी करणाऱ्या कंत्राटी ठेकेदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दिसून येत आहे नगरपंचायत प्रशासनावर तात्काळ कारवाई  करून शववाहिका उपलब्ध करून द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन प्रहार  संघटनेच्यावतीने करण्यात येईल, असा इशारा डॉ  विवेक सोनवणे यांनी दिला आहे.   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , आरोग्यमंत्री राजेश टोपे , नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री  बच्चू कडू,  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडेही ही  तक्रार त्यांनी केलेली आहे.

 

Protected Content