Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोनामुळे ऑक्सिजन पातळी कमी झाल्यानंतर मेंदूवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।  श्वसन यंत्रणेवर कोरोना विषाणूंचा प्रभाव पडत असल्याने श्वास घेण्यास त्रास जाणवत आहे. श्वसन यंत्रणेवरच नाही तर मेंदूवरही परिणाम होत आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची तपासणी केल्यानंतर ही बाब समोर आली आहे.

 

कोरोनामुळे ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या रुग्णांमध्ये ही बाब जास्त दिसून आली आहे. या रुग्णांमध्ये भ्रम निर्माण होणे, अचानक मानसिक स्थिती बदलणे अशा समस्या समोर येत आहेत. ऑक्सिजनच्या कमतरेतमुळे मेंदुतील ग्रे मॅटर कमी झाल्यानं असं होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मेंदूचं सीटी स्कॅन केल्यानंतर ग्रे मॅटरची मोजणी करण्यात आली, त्यात ही माहिती समोर आली आहे.

 

कोरोनाचा श्वसनावरच नाही तर मेंदूवरही परिणाम होत असल्याचं दिसून आलं आहे. जॉर्जियातील एका विद्यापीठानं केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. ब्रेन स्ट्रोकच्या उपचारानंतरही इतका प्रभाव पडत नाही असंही तज्ज्ञांनी सांगितलं.

 

ज्या रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. त्या रुग्णांमध्य ग्रे मॅटर वॉल्यूम कमी झाल्याचं दिसून आलं आहे. तर ज्या रुग्णांना ऑक्सिजन गरज भासली नाही. अशा रुग्णांमध्ये कोणताही बदल दिसून आला नाही. ताप आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मेंदूतील फ्रंटल टेम्पोरल नेटवर्कवर परिणाम होत असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे.

कोरोना झाल्यानंतर ज्या रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता असते. अशा रुग्णांना मेंदूचा विकार होण्याचा धोका आहे”, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

 

ग्रे मॅटर आपल्या मेंदूतील नर्वस सिस्टमचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. मसल्स कंट्रोल, स्पर्श जाणवणे, बघणे, ऐकणे, आठवण, आपल्या भावना, बोलणं, निर्णय घेण्याची क्षमता आणि आत्मविश्वास या सारख्या गोष्टी अवलंबून असतात. आपल्या मेंदुचे चार भागात वाटे असतात. त्यातील पुढच्या भागाला फ्रन्टल लोब, मागच्या भागाला पेरिंटल लोब, कानाजवळच्या भागाला टेम्पोरल लोब आणि कानामागील भागाला ऑकिपिटल लोब संबोधलं जातं. ज्या कोरोना रुग्णांमध्ये ऑक्सिजनची मात्रा कमी झाली आहे. त्या रुग्णांच्या फ्रन्टल लोबमध्ये ग्रे मॅटर कमी झाल्याचं दिसून आलं आहे. तर ज्या लोकांना ताप आला आहे. अशा लोकांमद्ये टेम्पोरल लोबमध्ये ग्रे मॅटर कमी झाल्याचं दिसून आलं आहे.

 

Exit mobile version