Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोनाबाधित रुग्णांकडून बिल आकारणी : मनसे आमदार पाटील यांची सरकारवर टिका

कल्याण, वृत्तसेवा । राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असतांना कल्याण, डोंबिवली परिसरातील अनेक कोरोनाबाधित रुग्णांकडून बिल आकारले जात आहे. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. रेशनकार्डाचा रंग बघून उपचार दिला जाईल का? असा प्रश्नही त्यांनी ट्विटरद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारला आहे.

राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना १०० टक्के मोफत उपचार देण्यात येतील अशी घोषणा १ मे रोजी केली होती. मग आता पांढऱ्या रेशनधारकांना बिल का आकारले जात आहे? कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प पडले असताना रेशनकार्डचा रंग बघून उपचार दिला जाईल का? असा प्रश्न आ. पाटील यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेत कोरोनाबाधितांचा आकडा ४५९ वर पोहोचला आहे. आज एका दिवसात ३५ कोरोना रुग्ण आढळले आहे. तर आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Exit mobile version