कोरोनापेक्षाही भयानक नवा विषाणू भारतात

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोनापेक्षाही भयानक नवा विषाणू भारतात आढळल्याचा दावा तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे. या विषाणूचा पहिला रुग्ण दिल्लीच्या गाझियाबाद येथील रुग्णालयात आढळल्याची माहिती समोर आली आहे.

 

महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाने थैमान घातलं. आधी कोरोनाची पहिली लाट आली. त्या लाटेवर भारताने मात केली. देशभरातील लॉकडाऊन हटवण्यात आला. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. पहिली लाट ओसरल्यानंतर अवघ्या काही महिन्यांनी भारतात पुन्हा कोरोनाची लाट आली. ही दुसरी लाट भयानक होती. या दुसऱ्या लाटेतील डेल्टा वेरिएंट हा विषाणू जास्त घातक ठरला. या विषाणूने हजारो रुग्णांचा जीव घेतला. आता ही लाट देखील ओसरताना दिसत आहे. पण ही लाट ओसरत असताना आणखी चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. कोरोना विषाणू नंतर देशात आणखी एका खतरनाक विषाणूची एण्ट्री झाल्याचा दावा तज्ज्ञ डॉक्टरांनी केला आहे

 

 

गाझियाबादमधील एका रुग्णालयात एका रुग्णाच्या नाकातून Herpes Simplex Virus असा नवा विषाणू आढळला आहे. हा विषाणू कोरोना विषाणू पेक्षाही जास्त घातक असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. गाझियाबादमध्ये या नव्या विषाणूचा पहिला बाधित रुग्ण आढळल्याचा दावा या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केला आहे. या विषाणूवर नियंत्रण मिळवलं नाही तर देशात पुन्हा हाहा:कार माजेल, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे

 

गाझियाबादचे डॉ. बीपी त्यागी यांच्या रुग्णालयात कोरोना आजारातून बरा झालेला रुग्ण दाखल झाला होता. त्याच रुग्णाच्या नाकात Herpes Simplex Virus हा नवा विषाणू आढळला आहे. हा विषाणू खूप घातक आहे. या विषाणूच्या बाधित रुग्णावर उपचारासाठी उशिर केला तर तो कोरोनापेक्षाही जास्त घातक ठरु शकतो. या विषाणूपासून बाधित रुग्णांचा उपचार खूप खर्चिक आहे, असाही दावा डॉ. त्यागी यांनी केला.

 

कोरोनावर  मात केलेल्या नागरिकांनी जास्त काळजी घेणं आवश्यक असल्याचं मत डॉ. त्यागी यांनी व्यक्त केलं. कोरोनाच्या संसर्गामुळे रोगप्रतिकार क्षमता कमकुवत होते. त्यामुळे कोरोनावर नुकतंच मात केलेल्या रुग्णांनी जेवणाकडे आणि आरामाकडे लक्ष द्यावं. कोणत्याही प्रकाराची धावपळू करु नये, असंही डॉ. त्यागी यांनी सांगितलं.

 

Protected Content