कोरोनापासून वाचण्यासाठी एस.एम.एस. त्रिसूत्रीचा अवलंब करा – रोहिणी खडसे-खेवलकर

मुक्ताईनगर प्रतिनिधी । परंतु कोरोना चे हे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. तरी आपल्याला अजुन आपली स्वतःची काळजी घेऊन आपली सेवा बजावयाची आहे. यामध्ये आपल्याला एस.एम.एस. म्हणजे सॅनिटाईजर, मास्क, सोशियल डिस्टनसिंग या त्रिसूत्रीच्या माध्यमातून आपला कोरोनापासून बचाओ होण्यास मदत होईल. असे प्रतिपादन रोहिणी खडसे-खेवलकर यांनी केले. मुक्ताईनगर येथे संवेदना फाउंडेशन तर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की, गेल्या सहा महिन्या पासून संपुर्ण जगात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे कोरोनाबाधित व्यक्तीच्या उपचार व इतर सेवांसाठी बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्ती सुद्धा तयार होत नाहीत परंतु या सहा महिन्यात डॉक्टर, पोलीस, नर्स, सफाई कर्मचारी, पत्रकार , हे आपला जीव धोक्यात घालून आपली सेवा बजावत आहेत या सेवाव्रतींचे कार्य अतिशय कौतुकास्पद आणि अभिनंदनिय आहे.

त्यांच्या या कार्याचा गौरव व्हावा आणि इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून रोहिणी खडसे खेवलकर या अध्यक्षा असलेल्या संवेदना फाउंडेशन मुक्ताईनगर तर्फे मुक्ताईनगर येथील या कोरोना योद्ध्यांचा मास्क, सॅनिटाईजर, आणि प्रमाणपत्र देऊन कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.

यामध्ये तालुका पोलीस स्टेशन मधील कर्मचारी, तहसील कार्यालय, पंचायत समिती मधील कर्मचारी, उप जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका, नगरपंचायत कर्मचारी, सफाई कर्मचारी, आरोग्य विभाग कर्मचारी, पत्रकार यांचा समावेश आहे. तसेच रोहिणी खडसे खेवलकर यांच्या तर्फे तहसिल कार्यालय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती मुक्ताईनगर येथे ऑटोमॅटिक हॅण्ड सॅनिटाईजर मशिन भेट देण्यात आली. यावेळी बोलताना रोहिणी खडसे खेवलकर म्हणाल्या, गेल्या सहा महिन्यां पासुन जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. आपण डॉक्टर ,पोलीस, नर्स, सफाई कामगार, पत्रकार, आणि इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता या युद्धात उतरून जनतेची व देशाची सेवा करत आहेत.

कोरोनाचे हे संकट हे एक प्रकारचे युद्ध असुन हे युद्ध साधे नाही. हे युद्ध आपल्याला शस्त्राने नाही तर सेवेने जिंकायचे आहे. आपण गेल्या सहा महिन्यापासुन आपला जीव धोक्यात घालून हि सेवा बजावत आहात. या युद्ध संकटात आपण कोविड योद्धा म्हणून मैदानात उतरला आहात. हे निश्चितच कौतूकास्पद आणि अभिमानास्पद आहे. आपले आभार कसे मानावे ते कळत नाही. परंतु आपले कौतुक व्हावे, आपल्या कार्याला बळ मिळावे व इतरांना तुमच्या कार्यातून प्रेरणा मिळावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

परंतु कोरोना चे हे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. तरी आपल्याला अजुन आपली स्वतःची काळजी घेऊन आपली सेवा बजावयाची आहे. यामध्ये आपल्याला एस एम एस या त्रिसूत्रीचा अवलंब करून इतरांना सुद्धा करायला लावायचा आहे.
एस एम एस म्हणजे सॅनिटाईजर, मास्क, सोशियल डिस्टनसिंग या त्रिसूत्रीच्या माध्यमातून आपला कोरोना पासून बचाओ होण्यास मदत होईल.  कोरोना काळात सेवा बजावत असताना इतरां बरोबर आपली स्वतः ची सुद्धा काळजी घ्या असे त्यांनी आवाहन केले

यावेळीतहसीलदार शाम वाडेकर, नायब तहसीलदार झांबरे ,पं.स. सभापती विद्या पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील,नगराध्यक्ष नजमताई तडवी, पं.स. सदस्य विकास पाटील, राजु सवळे, प्रदीप साळुंखे, विनोद पाटील, चंद्रकांत भोलाने, गट विकास अधिकारी सुभाष मावळे, तालुका आरोग्य अधिकारी निलेश पाटील, नगर पंचायत मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड, वैद्यकीय अधिकारी दसुरे, पि एस आय भारसाके, पीएसआय साळुंखे, उपनगराध्यक्ष मनीषा पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, माजी सभापती राजुभाऊ माळी, नगरसेवक पियुष महाजन, ललित महाजन, आसिफ बागवान, मुस्ताक कुरेशी, आरिफ भाई, प्रदीप पाटील, निलेश शिरसाट, मुकेश वानखेडे , निलेश मालवेकर, शिवराज पाटीलआदि उपस्थित होते.

Protected Content