Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोनाच्या प्रतिकारासाठी आ. शिरीष चौधरी यांच्या निधीतून ५० लाख

रावेर प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रावेर/यावल मतदारसंघातील ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या स्थानिक विकास निधीतून वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी ५० लक्ष निधी देण्यात येणार आहे.

कोरोना ( कोव्हिड १९) या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग एक प्रकारे संकटात सापडले आहे. भारतात ही कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंधक व नियंत्रण करण्यासाठी मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजीत पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोव्हीड १९ या संसर्गजन्य रोगासाठी तातडीच्या उपाययोजनांसाठी राज्याचे नियोजन विभागाकडुन आमदार स्थानिक विकास कार्यक्रमातर्गत वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यासाठी विशेष बाब म्हणुन ५० लाखाचा निधी उपलब्ध करून दिलेला असल्याची माहिती आमदार शिरीषदादा चौधरी यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीत चर्चा करतांना दिली.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार तर्फे तातडीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत विशेष बाब म्हणून उपलब्ध झालेल्या निधी मधून आमदार शिरीषदादा चौधरी यांनी मतदार संघातील ग्रामीण रूग्णालय, रावेर, पाल, यावल, न्हावी व मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्र निंभोरा, वाघोड, चिनावल, खिरोदा, लोहारा, भालोद, हिंगोणा, पाडळसे इ. यांच्यासाठी इन्फ्रारेड थर्मामीटर, पर्सनल प्रोटेक्शन डिस्पोजेबल किट्स, कोरोना टेस्टींग किट्स, एन-९५ फेस मॉक्स, ग्लोज, सँनीटायझर, ऑक्सीजन सिलेंडर, ऑक्सीजन सिलेंडर चे डिस्पोजेबल, फेस मॉक्स, सीम्पल सर्जीकल मास्क इ. व त्यासोबतच सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने कोव्हीड१९ या विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना करिता प्रमाणित केलेली तत्सम वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आमदार शिरीषदादा चौधरी यांनी सांगितले.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version