Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहिगाव परिसरात स्वॅब तपासणी शिबिर

दहिगाव ता.यावल प्रतिनिधी । प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडा सिम अंतर्गत तालुक्यातील दहिगाव परिसरातील दहिगाव, सावखेडासिम व महेलखेडी या गावात आरटीपीसीआर स्वॅब घेण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे यांनी मार्गदर्शन केले.

यावल तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी व मृत्यू दर कमी करणे , रुग्णाला पहिल्या पायरीवर ओळखने , रुग्णाचे लवकर निदान होऊन तो वाचावा व लवकर अलगीकरण झाला तर इतर आजूबाजूचे १५ व्यक्ती तो वाचवतो. या अनुषंगाने ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

गावातील व्यवसायिक व्यक्ती , खाजगी डॉक्टरांकडून मिळालेले संशयित रुग्ण , तसेच comorbid प्रतिकारशक्ती कमी असलेले अशा सर्व व्यक्तींचे प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिम कार्यक्षेत्रातील गावात ता. आ.अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे व वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वॅब तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

दहिगाव येथे ३४ , सावखेडासिम येथे २१ , व महेलखेडी येथे २५ याप्रमाणे शिबिरात स्वॅब घेण्यात आले. यात सावखेडासिम येथील एक ४५ वर्षीय व्यवसायिक पॉझिटिव्ह मिळून आला. सदर स्वॅब वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे यांनी घेतले व त्यांना आरोग्यसेवक राजेंद्र बारी व बालाजी कोरडे यांनी मदत केली.

शिबीर यशस्वीतेसाठी प्रवीण सराफ, अरविंद जाधव, समीर तडवी, अनिता नेहते, आशा सेविका पुष्पा पाटील, नीता महाजन, भाग्यश्री महाजन, अर्चना अडकमोल , महेलखेडी येथील आशा सेविका संगीता पाटील, व शहानुर तडवी यांनी परिश्रम घेतले. यावेळी दहिगाव येथील उपसरपंच देवीदास पाटील, पोलीस पाटील संतोष पाटील, पत्रकार जीवन चौधरी तर महेलखेडी येथील सरपंच विलास पाटील, पोलीस पाटील मधुकर पाटील, भोजराज येवले, ग्रामपंचायतचे बबलू पाटील, सुधाकर पाटील,व गोपाळ अडकमोल यांनी गावात जनजागृती करून शिबिरात सहकार्य केले.

Exit mobile version