Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा विविध टप्प्यात होणार सुरु : प्रधान (व्हडिओ )

भुसावळ, प्रतिनिधी । राज्यात दरवर्षी १५ जूनला शाळा सुरू करण्यात येतात. पण कोरोना व्हायरसमुळे शाळा ऑनलाइन व विविध टप्प्यात सुरु करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

आगामी १ जुलैला ९ ते १२ चे वर्ग सुरू करण्यात येणार आहे.इ. ११वीचे वर्ग दहावीच्या निकालानंतर उघडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे .तसेच इ. ६ ते ८ वीचे वर्ग ऑगेस्ट महिन्यात उघडणार तर ३ ते ५ चे वर्ग सप्टेंबर उडण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती प्रभारी शिक्षण अधिकारी तुषार प्रधान यांनी दिली. त्यांनी पुढे सांगितले की, १ ते २ रीच्या वर्ग त्यावेळेच्या परिस्थिती पाहून उघडण्याचे निर्णय शासन घेणार आहे. विद्यार्थीची पट संख्या पाहून अर्धा वेळेस दोन भागात शाळा सुरू करण्याचे निर्णय शाळेतील मुख्याध्यापकांना राहणार आहे. मागील वर्षी जी फी आकारण्यात आली होती त्यात कुठलीही वाढ न करता विद्यार्थीकडून तीन टप्प्यात फी वर्ष भरात भरण्याची सवलत शासनाने दिली आहे. ज्या शाळेमध्ये ऑनलाईन शिक्षण घेण्याची सुविधा आहे त्याना आदेश देण्यात आले आहे. शाळा सुरू होण्याच्या आधी सर्व मुख्याध्यापकांना शाळेची स्वछता करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. सोशल डिस्टनसिंगचे व सॅनिटायझर ची फवारणी करण्यात येणार आहे.

Exit mobile version