कोरोनाची लक्षणे जाणवताच तपासणी करून घ्या- बीडीओ दिपाली कोतवाल

रावेर प्रतिनिधी । कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी झाला असला तरी रावेर तालुक्यातील ९५ गावांमध्ये ५० वर्ष वयाच्या पुढच्या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात कोरोना सदृष लक्षणे जाणवल्यास संबधित आरोग्य पथकाकडून तपासून घेण्याचे अवाहन गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी केले आहे.

रावेर तालुक्यात कोरोना व्हायरसचा रिकव्हरी रेट चांगला आहे. कोरोना व्हायरसचा पादुर्भाव राहता कामा नये, यासाठी जिल्हा व तालुका प्रशासन कमालीची सर्तक आहे.जिल्हा प्रशासनाकडून रावेर तालुक्यातील ९५ गावांमध्ये पुन्हा कोरोना व्हायसरच्या विरुध्दात अभियान चालवणार आहे.यामध्ये ५० वर्ष वयाच्या पुढच्या कमीत-कमी २०० नागरीकांक्या प्रत्येक गाव पातळीवर तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी पंचायत समिती प्रशासनाला तपासणीचे उद्दीष्ट देण्यात आले असून याची दखल घेत गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी आरोग्य प्रशासनाका नागरीकांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहे.

मास्क हीच सद्याची लस – बीडीओ कोतवाल
रावेर ग्रामीण भाग कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत आहे. तरी प्रत्येक नागरिकांनी दिपाळी सारख्या सणामध्ये स्वता:ची काळजी घ्यावी. घरा बाहेर जातांना मास्क लावला पाहिजे, कुठे ही वावरतांना फिजिकल डीस्टन्स ठेवावे व प्रशासनाच्या सूचनेचे पालन करावे असे आवाहन गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी केले आहे.

Protected Content