Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोनाचा स्फोट : १० मंत्री अन् २० आमदार पॉझिटीव्ह !

मुंबई प्रतिनिधी | एकीकडे राज्यातील कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असतांना राजकारण्यांनाही याची बाधा मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे सावट गडद बनले असून आता रूग्णसंख्या वाढीस लागलेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसतेय. तर दुसरीकडे कोरोनाच्या डेल्टा विषाणूसह , ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्याही वाढता दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील मंत्रिमंडाळातील काही मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. याबाबत आज उपमुख्यमंत्र्यांनी अधिकृत माहिती जाहीर केली आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. जर यापुढेही राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत राहीली तर राज्य सरकार आणखी कठोर निर्बंध घालू शकते, असे संकेतही पवार यांनी दिले. कालच राज्य सरकारनं कोरोनाची नवी नियमावली जाहीर केलीय लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी नियमांचं भान ठेवलं पाहिजे, असंही ते म्हणाले. नव्यानं आलेला कोरोनाचा व्हेरिअंट वेगानं पसरत आहे. अमेरिका फ्रान्स, इंग्लंड येथे दररोज लाखो रुग्ण सापडत आहे. आपण दुसर्‍या लाटेची मोठी किंमतही मोजली आहे. प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी सरकारही प्रयत्न करतंय. आताच नियम कडक का असा आग्रह करु नये, सर्वांनी सहकार्य करावं, असंही पवार म्हणाले. यामुळे आता राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागणार का ? याकडे आता लक्ष लागले आहे.

Exit mobile version