Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी – तहसीलदार देवगुणे (व्हिडीओ)

रावेर (शालिक महाजन) । रावेर तालुक्यात तीन रूग्ण कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे. सावदा शहरातील गांधी चौकात दोन रूग्ण आढले आहेत. रावेरातील भगवती नगर परिसर पुर्णपणे सील केले आहे. दोन महिन्यात दोन रूग्ण आढळल्याने कोरोनाने एंट्री केलीय. शहरातील प्रतिबंधित केलेला भागात प्रशासनातर्फे निर्जंतूक फवारणी करण्यात आली असून तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी सर्वांनी खबरदारी घेण्याची गरज असल्याचे आवाहन आज तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी लाईव्ह ट्रेन्डस् न्यूजशी बोलतांना केले.

दोन दिवसात रावेर तालुक्यात दोन कोरोना व्हायरसचे पेशंट मिळाले त्यातील एका महिलाचा आज मृत्यू झाल्याने नागरीकांनी आता खरी काळजी घेण्याची गरज आली आहे. मागील दोन महिन्यांपासून रावेर तालुक्यात कोरोना वायरस येऊ नये, यासाठी महसूल प्रशासन, आरोग्य प्रशासन, पोलिस प्रशासन, सामजिक संस्था, राजकीय लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य लाभत आहे. आता तरी रावेर तालुक्यातील सुज्ञनागरीकांनी सद-विवेकबुध्दीने घरातच रहावे, जीवनाश्यक वस्तू वगळता विनाकारण नागरिकांनी बाहेर फिरू नये असे अवाहन आज तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी लाईव्ह ट्रेन्डस् न्यूजशी बोलतांना केले.

 

Exit mobile version