Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोनाचा जगभरात हाहाकार : आतापर्यंत ५३,२३८ जणांचा बळी !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरसने आतापर्यंत ५३ हजार दोनशे ३८ जणांचा बळी घेतला आहे. तर दहा लाख १६ हजार ४१३ जणांना या रोगाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत जगभरात दोन लाख १३ हजार ३५ जण कोरानामुक्त झाले आहेत.

 

चीनमधील वुहान शहरातून उद्भवेला कोरोनाने जगातील २०४ देशांत पसरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोना व्हायरसला महामारी असे घोषित केले आहे. या महामारीवर अद्याप कोणतेही औषध अथवा लस उपलबद्ध नसल्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. अमेरिकेत दोन लाख ४४ हजार ८७७ जणांना करोनाची लागण झाली आहे तर आतापर्यंत सहा हजांरापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. पृथ्वीच्या निम्म्या भागांमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची टाळेबंदी सुरू असतानाही गेल्या २४ तासांत करोना विषाणूने जगभरात हजारो बळी घेतले असून, यात स्पेनमधील नव्या १ हजार बळींचा समावेश आहे.

Exit mobile version