Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोनाचा कहर : शेअर बाजारात तब्बल १६०० अंकांची घसरण !

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनामुळे मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. आज मुंबई शेअर बाजारात तब्बल १६०० अंकांची घसरण झाली आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच ही मोठी घसरण झाल्याने निर्देशांक ३४००० अंकावर पोहोचला होता. राष्ट्रीय शेअर बाजारातही ५०० अंकांची घसरण होऊन तो १० हजारांच्या खाली पोहोचला आहे.

 

रिलायन्सचा शेअर सुद्धा १०० रुपयांनी कोसळला आहे. विमान कंपन्यांच्या शेअरमध्ये सुद्धा विक्रीची लाट उसळलेली पाहायला मिळत आहे. तर बँकांच्या समभागामध्ये मोठा फटका बसला आहे. एसबीआय, इन्फोसिस, एल अॅण्ड टी, टाटा स्टिल आदी मोठ्या कंपन्यांचे शेअर पाच ते सात टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे बाजारात मोठी घबराहट कायम असल्याचे दिसून येत आहे. तर आरबीआयने येस बँकेवर घातलेले निर्बंध आणि सौदी अरेबिया आणि रशियात तेल दरावरुन युद्ध सुरु आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात घसरण झाली आहे. सेन्सेक्सची पडझड होण्यामागे ही सुद्धा दोन प्रमुख कारणे आहेत.दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढच्या महिन्याभरासाठी युरोपमधून अमेरिकेत प्रवासबंदी जाहीर केली आहे. त्याचा फटका शेअर बाजाराला बसला आहे.

Exit mobile version