Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरपावली येथे पथदिवे बसविणे कामाचा शुभारंभ

यावल,  प्रतिनिधी   यावल तालुक्यातीत कोरपावली ग्राम पंचायतीच्या वतीने गावात  विविध भागात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत मंजूर एलईडी लाईट पथदिवे बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. 

 

सरपंच गटाचे पिरण पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामीण सेवा फाउंडेशन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी सरपंच जलील सत्तार पटेल,  समाजसेवक नारायण अडकमोल,  समाजसेवक मुक्तार पिरण पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत १५ व्या वित्त आयोगातून मंजूर करण्यात आलेली एलईडी लाईट पथदिवे  बसविण्यात येत आहेत.  या कार्यक्रमाचा शुभारंभ सरपंच विलास नारायण अडकमोल ,उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल, ग्रामसेवक प्रवीण सपकाळे, माजी सरपंच प्रेमचंद महाले,  मुजफ्फर पटेल, माजी सरपंच विद्यमान सदस्या कविता कोळबे , काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी उमेश जावळे, तुळशीदास कोळंबे, कोरपावली येथील सिव्हिल इंजिनिअर अविनाश अडकमोल, सिकंदर तडवी, ग्रामपंचायत  सदस्य सत्तार तडवी, आरिफ तडवी, नथ्थू नेहेते, अमोल नेहेते, अफरोज पटेल, जुम्मा तडवी, वायरमन अरमान तडवी, सादिक पटेल,  जावेद पटेल ,भरत चौधरी,  रोहित अडकमोल, अरुण भालेराव,  ग्रामपंचायत शिपाई किसन तायडे, सलीम तडवी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Exit mobile version