Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरपावली येथील जवान महेंद्र पाटील यांची सेवानिवृत्ती

यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील रहिवाशी जवान महेंद्र पाटील हे भारतीय सैन्य दलात २० वर्षे सेवा बजावल्यानंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले. आज गुरूवार ७ ऑक्टोबर रोजी दुपारी कोरपावल गावात दाखल झाल्यानंतर त्यांचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले.

यावल तालुक्यातील महेंद्र पाटील हे २० वर्षे सेवा बजावून भारतीय सैन्य दलाच्या आर्मी सेवेतील नायक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. यावल शहरातील छत्रपती फाऊंडेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. महेंद्र पाटील हे २५ सप्टेंबर २००१ रोजी आर्मी सेवेत रूजू झाले होते. प्रशिक्षणानंतर राजस्थान, जम्मू काश्मीर, गुजरात, जोधपूर, आसाम, उत्तरप्रदेश अशा ठिकाणी वीस वर्षे सेवा दिली.

यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात विरावली ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य ॲड. देवकांत पाटील, दिनकर पाटील, विरावली विकास सोसायटीचे माजी चेअरमन संजय पाटील, नायगाव शाळेचे उपशिक्षक बी. डी. पाटील, विरावली गावातील माजी सैनिक अर्जुनराव पाटील, गिरीश पाटील, आत्माराम धनगर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राकेश सोनार, कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे, हितेश गजरे, गोलू माळी, कोरपावलीचे भरत चौधरी, लीलाधर पाटील, किशोर पाटील, अक्षय पाटील,  अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष अनिकेत सरोटे यांनी महेंद्र पाटील यांचे सपत्नीक सत्कार करण्यात आला.

Exit mobile version