Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरपावलीत प्रतिबंधित क्षेत्राला सरपंच, ग्रामसेवक, आशा कर्मचाऱ्यांची भेट

 

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली गावातील महालेवाडयात चार कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आले असल्याने घोषीत करण्यात आलेल्या प्रतिबंधीत क्षेत्राला सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह आशा कर्मचारी भेट देवून बाधितांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची चौकशी केली. 

दि. १० मार्च रोजी सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केन्द्राव्दारे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नसीबा तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपावली गावातील ८ कुटुंबांतील ३० जणांच्या तपासणीत एकुण चार जण हाय रिक्स कोरोना पॉझीटीव्ह आढळुन आले होते तर २४ जण हे लो रिक्स मिळुन आलीत. एकुण ३० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली यात रोग प्रतिकार क्षमता कमी असलेले ६ जण मधुमेहच्या आजाराचे १ रक्तदाब व हृदयरोगाचे रुग्ण५ तर १० वर्षाखालील बालके व ५० वर्षावरील ११ व्यक्ती हे मिळुन आले आहेत. कोरपावली गावाचे सरपंच विलास नारायण अडकमोल, उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल, ग्रामसेवक प्रविण सपकाळे, आशा कर्मचारी नजमा अरमान तडवी, हिराबाई सुखदेव पांडव, हसीना सिकंदर तडवी या प्रतिबंधीत क्षेत्रावर नियमित भेट देवुन रूग्णांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. त्याचप्रमाणे गावातील सरपंच विलास अडकमोल यांनी शासनाच्या व आरोग्य प्रशासनाच्या कोवीड19 या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी ग्रामस्थांनी करून आपली आपल्या कुटुंबाच्या आणि गावाच्या ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.

Exit mobile version