Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरपावलीच्या सरपंचांचा माजी आमदार प्रा . सोनवणे यांच्या हस्ते सत्कार

 

यावल :  प्रतिनिधी ।  कोरपावली येथील  नवनिर्वाचित सरपंच  विलास अडकमोल यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार  चोपडा विधानसभा क्षेत्राचे  माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी करण्यात आला

 

याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील, शिवसेनेचे यावल तालुकाप्रमुख रविन्द्र सोनवणे, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख योगेश पाटील, धनराज पाटील, सेनेचे चोपडा विधानसभा क्षेत्र प्रमुख  विकास पाटील, तालुका संघटक सुकलाल कोळी, पिंप्रीचे सरपंच मोहन कोळी, भिमराव इंधने, मयूर खर्चे आदी उपास्थित होते .

 

कोरपावली  गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना व आम्ही आपल्या पाठीशी असल्याचे आश्वासन माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सरपंच विलास अडकमोल यांना दिले . मागील पंचवार्षिक कामाचा मागोवा घेतला असता माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी कोणतेही पक्षीय मतभेद न ठेवता चोपडा विधानसभा मतदार संघातील विविध गावांना विकास कामांसाठी निधीची कमतरता पडु दिली नसल्याचे  शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील यांनी सांगीतले

Exit mobile version