Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरडया विहीरीत पडलेल्या श्वानाला प्राणी मित्रांकडून जीवदान

 

 यावल : प्रतिनिधी  |  येथील बस स्थानक  परिसरातील कोरड्या विहिरीत आज अचानक एक कुत्रा पडून  तो ओरडत असल्याने परिसरातील युवकांनि  त्या श्वानास सुखरूप बाहेर काढले .

 

आज दुपारच्या वेळी ही घटना घडलेल्या यावल शहरातील  वन्यजीव प्रेमी राहुल कचरे, सर्पमित्र जयवंत माळी, मनोज बारी, लक्ष्मण बारी, गिरीश चौधरी या युवकांच्या निर्दशनास ही बाब आल्याने  सर्वांनी श्वानास  विहिरीत उतरून जिवंत बाहेर काढण्यात यश मिळवले. युवकांनी केलेल्या कामामुळे त्यांचे सर्व स्थरातून कौतुक करण्यात येत आहे.

 

शहरात किंवा तालुक्यातील कोणत्याही वन्यजीव किंवा सर्प संकटात नागरीक सापडले असल्यास नागरीकांनी तात्काळ आमच्या या मोबाईल क्रमांकावर 8055808367, 8857965858 वरील वर संपर्क साधावा असेही आवाहन या युवकांच्या वतीने करण्यात आले आहे .  उन्हाळा सुरू झाला आहे त्यामुळे  परिसरातील काही पक्षी  व प्राण्यांसाठी आपल्या घराजवळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी  असेही आवाहन निसर्गप्रेमिंकडुन करण्यात येत आहे.यावल एसटी आगाराच्या कार्यक्षेत्रात असलेली ही अनेक वर्षापासुन विहीर उघडयावर  आहे  काही अप्रीय घटना घडण्याच्या आधीच तात्काळ विहीरीवर सुरक्षा जाळी बसवण्यात यावी अशी मागणी होत  आहे.

Exit mobile version