कोकण कन्या बॅंडची ‘बालगंधर्व’मध्ये धमाल

जळगाव, प्रतिनिधी | मुंबईच्या स्निती मिश्रा यांनी शास्त्रीय गायना – शास्त्रीय संगीतासह भारतीय अभिजात संगीत सादर केले. कोकण कन्या बँन्डने सूफी, गझल, जुनी हिंदी चित्रपट गीते सादर करून रसिकांची मने जिंकली. कलावंतांच्या अफलातुल स्वरांनी बालगंधर्व महोत्सवाचा मंच आज बहरुन गेला.

स्निती मिश्रा यांनी ‘हर हर हर महादेव महेशश्वर..’ मालकंस या रागात निबध्द गीत सादर केले. यात रसिक महादेवाच्या भक्तीत तल्लीन झाले. छोटा ख्याल सादर केले. बोल होते ‘कोयलिया बोले..’प्रसिध्दी गायीका स्व.किशोरीताई अमोणकर यांचा मराठी अभंग ‘हे शाम सुंदर राज असा मनमोहना..’ हे रूपक तालामध्ये सादर केले. त्रितालमध्ये पं. वसंतराव देशपांडे गाऊन अजरामर केलेले ‘घेई छंद मकरंद.. ‘ हे नाट्यगीत सादर केले. स्निता मिश्रा यांनी त्यांचे दादा गुरू पंडित बलवंतराव भट यांचे ‘होली होली खेलत नंदलाल’ राग आडानामध्ये सादर केले. अडाणा रागामधील तरणा ‘कान्हा दे रे’ सादर करून समारोप केला. स्निता मिश्रासोबत यशवंत वैषणची तबला साथ व मिलिंद कुलकर्णी यांची संवादिनी साथ रसिकांना मोहिनी घातली.

यंदाच्या बालगंधर्व महोत्सवाचे आकर्षण असलेल्या मुंबई येथील कोकण कन्या बॅंड संगितकार रविराज कोलथरकर, आरती सत्यपाल, अरूंधती तेंडुलकर, रसिका बोरकर, स्नेहा आयरे, निकिता घाटे, साक्षी मराठे व विशाल सुतार यांनी काव्य किरणांची प्रभात रंगवली. पंचतुंड ही पारंपारिक नांदी वेगळ्या ढंगात सादर केली. यानंतर ‘हा झेंडा कुणा गावाचा’ रसिक श्रोत्यांच्या मनावर अक्षरशः बिंबली. ‘आज जाने की जिद ना करो,’ ‘लग जा गले’ या हिंदी सिनेगितांसह अभंगांची मेलडीने जळगावकर रसिकांना आनंदभुती करून दिली. यानंतर ‘जिव रंगला जिव दंगला’या सिनेगीतासह भावगीत मेलडीने रसिकांवर अधिराज्य गाजविले. नाट्यगित व लक्ष्मीकांत बेर्डे लावणी मेलडी रसिकांना मोहीत करून गेली. विरसावरकरांचे ‘ने मजसी ने.. परत मातृभुमीला’ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकाराने बालगंधर्व महोत्सवाच्या समारोप झाला.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भारतीय स्टेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, भारतीय जीवन विमा, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, तसेच संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली यांचे बालगंधर्व महोत्सवाला प्रायोजकत्व लाभले असुन आजच्या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधिक्षक डाॕ. प्रविण मुंडे, जळगाव जनता बँक चे सीईओ पुंडलिक पाटील, संचालक कृष्णा कामटे, पश्चिम क्षेत्र केंद्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर चे शशांक दंडे, जैन इरिगेशनच्यावतीने विजय महोरील,अनिल जोशी, विश्वप्रसाद भट, इंडियन आॕईलचे प्रतिनीधी सौ.किरण शिंदे, केशवस्मृतीचे अध्यक्ष भरत अमळकर, भारतीय जीवन विमा कंपनीचे चंद्रशेखर आगरकर, डाॕ. अर्पणा भट, दिपक चांदोरकर, दिपीका चांदोरकर यांच्यासह कलावंताची उपस्थिती होती. मैफिलचे सादरीकरण करणाऱ्या कलावंताचे प्रतिष्ठानच्या वतीने पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. गणेशवंदना मयुर पाटील यांनी सादर केली. वरूण देशपांडे यांनी आभार मानले.

बालगंधर्व संगीत महोत्सव-2023 ची घोषणा

स्व.वसंतराव स्मृती प्रतिष्ठानतर्फे होणाऱ्या सांगीतिक बालगंधर्व महोत्सव दि. 6, 7 व 8 जानेवारी 2023 ची घोषणा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दिपक चांदोरकर यांनी केली.

Protected Content