Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोंडाईबारी घाटात बस दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू

नंदुरबार वृत्तसंस्था । धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर विसरवाडीजवळील कोंडाईबारी घाटात खाजगी ट्रॅव्हल्सच्या झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव हुन सुरतकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची बस प्रवासी घेऊन सुरतकडे निघाली होती. मध्यरात्रीच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस कोंडाईबारी घाटात आल्यानंतर दर्ग्या जवळील घाटात असलेल्या सुमारे चाळीस फूट दरीत ती कोसळली .हा अपघात कसा झाला. याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती पुढे आलेली नाही. जळगावहून सुरतकडे जात असताना बुधवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास कोंडाईबारी घाटातील दर्ग्या जवळील पुलाखाली कोसळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे तर 30 ते 35 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील काही प्रवासी गंभीर आहेत. अपघातातील मृतकांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात येत आहे. जखमींची संख्या जास्त असल्यामुळे विसरवाडी, नवापूर, खांडबारा , नंदुरबार, पिंपळनेर, दहिवेल येथील 108 रुग्णवाहिकांना पाचारण करण्यात आले असून उपचारासाठी तातडीने विसरवाडी रुग्णालयात हलविण्याचे काम रुग्णवाहिकांद्वारे सुरू आहे.

Exit mobile version