Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कॉंग्रेसतर्फे संविधान दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कडून शहरजिल्हा अध्यक्ष शामभाऊ तायडे यांच्या नेतृवात संविधान दिन शहरच्या विविध भागात उत्सहात साजरा करण्यात आला.

 

जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जुने जळगाव भागातील आंबेडकर नगर येथे बलभीम व्यायाम शाळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा रेल्वे स्टेशन येथे अभिवादन करून संविधान जागर रॅली काढण्यात आली. काँग्रेस भवन येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून संविधानातील उद्देशीकाचे सामूहिक वाचन करून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली. याप्रसंगी सरचिटणीस प्रदीप सोनवणे, जगदीश गाढे, जाकीर बागवान, अमजद पठाण, सखाराम मोरे, मोहन गांधी, सकीना तडवी, नारायण राजपूत, शशी तायडे, महेंद्रसिंग पाटील, उमेश तायडे, रवी चौधरी, मालोजी पाटील, रफिक शेख, योगेश देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version