कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरूड यांना जयंतीनिमित्ताने अभिवादन

 

शेंदुर्णी, प्रतिनिधी । आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी विद्यालयात संस्थेचे प्रेरणास्थान कै.आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांची ९१ वी जयंती सोहळा उत्साहात संपन्न करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाची सुरुवात ही कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून व श्री हरी प्रसाद महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. आर. शिंपी यांनी स्वीकारले.

याप्रसंगी विद्यालयातील उपशिक्षक डी एस वारंगणे, भरत पाटील ,कलेश गरुड उपमुख्याध्यापक आर. एस. चौधरी यांनी बापुसाहेब यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव सतीशराव काशीद, महिला संचालक उज्वलाताई काशीद, संचालक 6देवश्री काशीद, संचालक अभिजीत काशीद उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. आर. शिंपी यांनी बापूसाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या कार्याची माहिती सांगितली या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली यामध्ये संस्थेचे सचिव सतीश राव काशीद, महिला संचालक उज्वलाताई काशीद, संचालक कुमारी देवश्री काशीद, संचालक अभिजीत काशीद, विद्यालयाचे मुख्याध्यापक डी आर शिंपी, उपमुख्याध्यापक आर एस चौधरी, पर्यवेक्षक ए बी ठोके तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली. सूत्रसंचालन उपशिक्षक शिरापुरे यांनी केले व आभार पर्यवेक्षक ए. बी.  ठोके यांनी मानले.

Protected Content