Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

के.सी.पार्क येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग

 

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कानळदा रोवरील के.सी.पार्क येथे अज्ञात मोबाईलधारकाने अल्पवयीन मुलीला फोन करून लग्न करण्याचे आमिष दाखवत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक महिती अशी की, शहरातील कानळदा रोडवरील के.सी.पार्क येथील १७ वर्षीय मुलगी आईवडीलांसह राहते. अल्पवयीन मुलगी शिक्षण घेत असून २९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता अनोळखी मोबाईल नंबरवरून एकाने फोन केला. मला तुला भेटायचे आहे, माझ्याशी लग्न करत नाही तर तुझे लग्न मोडून टाकेल अशी धमकी देत मोबाइलवरून अल्पवयीन मुलीला मनास लज्जा उत्पन्न होईल असा बोलला. पिडीत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि चंद्रकांत पाटील करीत आहे.

Exit mobile version