Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केसीईचे आयएमआरमध्ये शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यान

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | केसीईचे आयएमआरमध्ये शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.  याप्रसंगी जयवर्धन नेवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

जयवर्धन नेवे म्हणालेत, आज शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३४८ वर्षे झालीत. ह्या जाणत्या राजाकडे उपजतच आर्ट ऑफ लिव्हिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, बाॅडी लॅन्ग्वेजचे ज्ञान होते. पहिली मोठी लढाई १६४८ साली. राजांचा नजरेत भरणारा मोठा पराक्रम राजे २६ वर्षाचे असतांना केलेला जावळीचा पराक्रम होय. . शिवरायांसारख्या अलौकिक राजांचा राज्याभिषेक ४४  व्या वर्षी झाला. तोपर्यंत अफजलखान, शाहिस्तेखान मिर्झा राजा जयसिंग, आणि खुद्द आलमगीर औरंगजेब यांच्यासारखे शत्रुंवर राजांनी मात केली. शिवाजी राजे कुशल सेनानी आणि युध्दतज्ञ होतेच पण त्याबरोबरच ते मुलकी कारभारात तज्ञ होते. राजे इतक्या लढाया आयुष्यभर लढले पण त्यांनी प्रजेवर कधीही नवे कर लादले नाही. नवी गावे वसवली. शेतसारा निश्चित केला. नवीन किल्ले बांधलेत. जुने किल्ले मजबूत केलेत. किल्ल्यांची धान्यकोठारे भरुन ठेवली. हे सर्व सांगत असतांना छत्रपती शिवाजी महाराज हे  व्यवस्थापन आणि प्रशासन कारभारात किती तज्ञ ते होते हे दर्शवते असे श्री. नेवे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी एमबीए कोआॅरडिनेटर डॉ. पराग नारखेडे यांनी त्याचे स्वागत केले. सूत्रसंचालन व आभार डॉ शमा सराफ यांनी मानले.

Exit mobile version