Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केवलाई फाऊंडेशनतर्फे उद्या रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रम

 

पाचोरा, प्रतिनिधी । येथील केवलाई फाऊंडेशनतर्फे उद्या सोमवार दि. १४ रोजी पाचोरा बस स्थानकात “रस्ते सुरक्षा जनजागृती” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

“रस्ते सुरक्षा जनजागृती” कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, तहसिलदार कैलास चावडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, पाचोरा आगार व्यवस्थापक देवेंद्र वाणी, आगार वरिष्ठ सचिव रवि पाटील, आगार ए. टी. एस. मनोज तिवारी उपस्थित राहणार आहेत. या रस्ते सुरक्षा जनजागृती कर्यक्रमासचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन केवलाई फाऊंडेशनचे अध्यक्ष आबा पाटील, सचिव निता पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version