Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केळी पिकास बोर्डभाव मिळण्याबाबत निवेदन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | केळी पिकास बोर्डभाव मिळावा, जे कोणी व्यापारी बोर्ड भाव लिहत नसतील त्यांच्यावर रितसर गुन्हे करण्यात यावे, या मागण्यांसंदर्भात शेतकरी संघटनेतर्फे आज तहसिलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले‌.

केळी उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाव, केळी खरेदी ग्राहकाला ही योग्य भावात केळी उपलब्ध व्हावी, म्हणून केळी उत्पादक शेतकरी व व्यापारी यांच्यासह विचारातुन अस्तित्वात आलेली व गेल्या २५ वर्षांपासून यशस्वीपणे सुरू असलेली “बोर्डभाव, बोर्डानुसार केळी खरेदी” ही केळी व्यापाऱ्यांनी आप आपसात लाॅबिंग करुन स्वतः च्या अति स्वार्थाचा विचार करत मार्केटला उठाव नाही, अशी बहाणेबाजी व अफवा पसरवून बोर्ड भावाची पद्धत मोडीत काढली आहे.

केळी पिकास बोर्डभाव तात्काळ मिळवून देवुन केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा तसेच स्थानिक केळी व्यापारी आपल्या दुकानात रोज बोर्ड भाव लिहत होते. मात्र कोराना काळानंतर बोर्ड भाव लिहणे केले आहे. जे कोणी व्यापारी बोर्ड भाव लिहत नसतील त्यांचेवर रितसर गुन्हे करण्यात यावे, या मागण्यांसंदर्भात शेतकरी संघटनेतर्फे आज दि. १० आॅगस्ट रोजी तहसिलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले‌.

निवेदन देते वेळी शेतकरी संघटनेचे जळगांव जिल्हा अध्यक्ष संजय महाजन, पाचोरा तालुका अध्यक्ष नाना महाजन, शहर अध्यक्ष मयुर मणियार, उपाध्यक्ष सुनिल पाटील, स्वरुप राजपुत (अध्यक्ष, नेरी), मन्सुर मारवाडी (अध्यक्ष, नगरदेवळा), महेश सोमवंशी, भैय्या महाजन, विनोद राऊळ, मनोज राजपुत, विजय राऊळ, रणजीत राऊळ, भिमसिंग खंडाळे, कृष्णराव पाटील सह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व मोठ्या संख्येने केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Exit mobile version