Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केळी पिकविम्याचे जाचक नियम सुधारले : आ. चौधरी यांचा पाठपुरावा

यावल,  प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकविम्याच्या जाचक नियमात बदल करण्यात यावेत अशी मागणी आ. शिरीष चौधरी यांनी केली होती. या मागणीला यश आले असून शासनाने केळी पिकविम्याच्या जाचक नियमात अखेर बदल केले आहे.                                                     

आ. शिरीष मधुकरराव चौधरी यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर,  मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे व माजी केन्द्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांच्याकडे पिकविम्याच्या जाचक निकषांमध्ये बदल करण्याची मागणीला यश आले आहे.  शासनाने केळी पिकविम्याच्या जाचक नियमात अखेर बदल केले आहे.   राज्य शासनाने जळगाव जिल्ह्यातील यावल, रावेर, चोपडा या क्षेत्रातील केळी उत्पादक शेतकरी मंडळींना या प्रधानमंत्री फळपिक विम्यातून नव्याने हवामानावर आधारीत प्रधानमंत्री फळपिक विमा योजनेत बदल केल्याने  जळगाव जिल्ह्यातील जवळपास ७० हजाराच्यावर असलेल्या केळी पिक उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.  राज्य शासनाने २०१९ मध्ये हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेत पुढील २०२० व २०२१ या वर्षाकरिता निकषात बदल केले होते. याबदलामुळे  केळी उत्पादक शेतकऱ्यांना  प्रधानमंत्री पिक विम्याच्या योजनाचे लाभ मिळणे अवघड झाले होते. आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांनी  केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर, माजी कृषीमंत्री खासदार शरद पवार , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  राज्याचे कृषीमंत्री दादासाहेब भुसे , राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातुन केळी शेतकऱ्यांच्या पिक विम्याच्या जाचक अटीशर्तीत बदल करीत जैसे थे करण्यात यश मिळवले आहे. आ. शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नांना यश आल्याने जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी बांधवांना न्याय मिळाल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

 

Exit mobile version