केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या – किसान मोर्चाची (व्हिडिओ) मागणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीचे निवेदन प्रदेश किसान मोर्चा संपर्क प्रमुख सुरेश धनके यांनी आ. राजूमामा भोळे यांना दिले.

 

निवेदनाचा आशय असा की, गेल्या पंधरा दिवसात जळगाव जिल्ह्यात वादळाचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसल्याने हजारो हेक्टर क्षेत्रातील केळी जमीनदोस्त झाल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून त्यांची अवस्था खूपच दयनीय झाले आहेत. तरी त्यांना शासनाने त्वरित हेक्टरी दीड लाख रुपये मदत करण्यात यावी. जेणेकरून शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. तसेच हवामानावर आधारित फळपीक विमाचे अति थंडी व अती तापमान यांचे निकस मंजूर झालेले असून त्याच प्रमाणे वादळाचे सुद्धा कोणतेही टक्केवारीचे निकष न लावता सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये त्वरित मदत मंजूर करण्यात यावे. त्याचप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामे त्वरित करण्यात यावे, पंचनामे करत असताना वाऱ्याच्या वेगामुळे केळीची फाटलेली पाने व खोडाच्या तुटलेल्या मुळा या बाबींचा विचार करावा. वाऱ्याच्या वेगामुळे केळी बागांचे नुकसान होऊन साधारण ८-१५ दिवस झालेले आहेत. अद्याप विमा कंपनीद्वारे बाधित क्षेत्रापैकी २५% क्षेत्रफळाचे पंचनामे झालेले आहेत. अशा परिस्थितीत केळी बागायतदार शेतकऱ्यांची जमीन पावसाळा सुरु होण्याच्या अगोदर तयार न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे जितके पंचनामे झालेले आहेत त्याच्या आधारावर सर्व केळी बागायतदार शेतकऱ्यांचे केळी पिक विमे मंजूर करण्यात यावे. व शेतकऱ्यांना पंचानाम्याविना फोटोच्या आधारावर शेतजमीन तयार करण्याची अनुमती द्यावी. तसेच पंचनाम्यासाठी शासन स्तरावरून संबंधित तलाठी व कृषी सहाय्यक यांना पंचनामे करण्यासंदर्भात सूचना करण्यात याव्या. मागील वर्षी झालेल्या नुकसानीचे अनुदान हेक्टरी दीड लाख त्वरित देण्यात यावे. शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळण्याची शिफारस करण्यात यावी अशी मागणी केली. निवेदनावर किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी, मधुकर काटे, राजन लासूरकर, हर्षल पाटील, हिराभाऊ चौधरी आदींची स्वाक्षरी आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3170081506547488

 

Protected Content