Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केळी उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा : नगरसेवक डॉ. फेगडे यांची मागणी

यावल  प्रतिनिधी | केळी उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक थांबविण्यात यावी अशी मागणी यावलचे नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांना निवेदनाद्वारे केली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, गेल्या अनेक दिवसापासून केळीचे बोर्डाचे भाव आणि खरेदी भाव यात तफावत आहे. जे बोर्डाने ठरवलेले भाव असतात ते व्यापारी मान्य करत नाहीत आणि अतिशय पडलेल्या भावात शेतकऱ्यांकडून माल खरेदी करून नफेखोरी करत आहे या सर्व व्यवस्थेवर बाजारसमित्यांचा वचक नसून बाजार समितीत अनेक वेळा ठराव करून सुद्धा शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे १००० रु चा बोर्डाचा भाव असताना सुद्धा २०० ते ३०० रुपयांपर्यंत केळी खरेदी केली जाते. शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते, शेतमाल शेतातच पिकतो, वाया जातो. तरी कापणी होत नाही या सर्व समस्यांचे निराकरण व्हावे ही शेतकऱ्यांची मागणी आहे आणि आपल्या माध्यमातून आपण उपाययोजना कराव्यात अन्यथा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि योग्य कारवाई न झाल्यास रास्ता रोको आदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. जास्त जमिनी असलेल्या शेतकऱ्यांना तरी व्यापाऱ्यांच्या दारात काहीतरी स्थान असते. परंतु, अल्पभूधारक शेतकरी बोलूसुद्धा शकत नाही आणि त्याची जास्तच पिळवणूक होते. केळी महामंडळ स्थापन होईल तेव्हा होईल आणि उपाययोजना करेल तेव्हा करेल तोपर्यंत केळी उत्पादक शेतकऱ्यांनी मरणयातना सोसायच्या का? असा प्रश्न डॉ. फेगडे यांनी विचारला आहे. याप्रसंगी भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष डॉ. नरेन्द्र वामन कोल्हे, परेश नाईक , रितेष बारी आदी उपस्थित होते.

Exit mobile version