Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केंद्र सरकारच्या वर्षपूर्ती अभियानात अजय भोळे यांच्यावर कुटुंब संपर्काची जबाबदारी

भुसावळ प्रतिनिधी । मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त अभियान राबविण्यात येत असून यात पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस अजय भोळे यांच्यावर रावेर लोकसभा मतदारसंघात कुटुंब संपर्काची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, केंद्रातील मोदी सरकार दुसर्‍यांदा सत्तारूढ झाल्यास नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे वर्षपूर्ती अभियान राबविण्यात येत आहेत. यात विविध पदाधिकार्‍यांना महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. यात येथील माजी नगरसेवक तथा ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस अजय भोळे यांच्यावर कुटुंब संपर्काची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या माध्यमातून आपण मोदी सरकारच्या जनहितार्थ निर्णयाची माहिती रावेर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचवणार असल्याचे प्रतिपादन अजय भोळे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना केले आहे.

दरम्यान, अजय भोळे यांच्यासोबत पक्षाने नंदकिशोर महाजन- संयोजक, प्रदीप वसंतराव पाटील-सहसंयोजक, नवलसिंग राजपूत- विधानसभा व्हर्च्युअल; हर्षल गोविंदा पाटील- व्हाटसअ‍ॅप ग्रुप निर्माण; सुनील रमेश काळे- व्हर्च्युअल मोर्चा निर्माण यांना जबाबदारी सोपण्यिात आली आहे.

तर जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी सदाशिव पाटील-संयोजक; पी.सी. आबा पाटील-सहसंयोजक; सचिन अर्जुन पानपाटील- व्हाटसअ‍ॅप ग्रुप निर्माण; सोमनाथ पाटील-विधानसभा व्हर्च्युअल; के.बी. साळुंखे- कुटुंब संपर्क व कपिल शिवाजीराव पाटील व्हर्च्युअल मोर्चा अशा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

Exit mobile version