Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केंद्र सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणाचा काँग्रेसकडून जाहीर निषेध

जळगाव : प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी काँग्रेसच्या वतीने देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप सरकारविरोधात  आंदोलन करण्यात आले  

सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. 

आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश असून संघाच्या इशा-यावर चालणारे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आरक्षण संपविण्यासाठीच काम करत आहे. देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांना पत्र लिहून ओबीसींचा इम्पिरीकल डेटा देण्याची मागणी केली पण केंद्राने तो दिला नाही. केंद्राने ओबीसींचा डेटा दिला नाही, त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्याला सध्याचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे. ओबीसींचे हे राजकीय आरक्षण घालवून ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा भाजपाचा डाव आहे. भाजपच्या या ओबीसीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने  आंदोलन करण्यात आले.

2014 पासून केंद्रामध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशांमध्ये  एक प्रकारची मोदींची अघोषित आणीबाणी लागू झालेली आहे देशातील अर्थव्यवस्थाही ढासळलेली आहे देशांमध्ये महागाईने उच्चांक गाठलेला आहे या संपूर्ण परिस्थितीमध्ये जनता त्रस्त झालेली आहे  ज्या पद्धतीने 26 जून 1975 रोजी स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी विरोधकांची देशात माजलेली अराजक त्याला पायबंद घालण्यासाठी घोषित आणीबाणी लागू केली होती त्याच पद्धतीने आज सत्ताधारी मोदी सरकारची देशांमध्ये अराजकता माजली असताना आज काँग्रेस पक्षाच्या वतीने मोदींच्या या अघोषित आणीबाणीचा जळगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने एनएसयूआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली काळे झेंडे दाखवून जाहीर निषेध व्यक्त केला गेला

याप्रसंगी एन एस यू आय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, शहर उपाध्यक्ष श्याम तायडे, प्रदीप सोनवणे, ज्ञानेश्वर कोळी, योगेश देशमुख, दीपक सोनवणे, जगदीश गाढे , अमजद पठाण, मनोज सोनवणे, जाकीर बागवान, परवेश पठाण,  मनोज चौधरी, राहुल भालेराव ,पीजी पाटील, विष्णू घोडेस्वार, मीनाताई , योगिता शुक्ल, प्रमोद घुगे , भिकन सोनवणे, सचिन माळी , गोकुळ चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते 

 

 

Exit mobile version