Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळायला हवी : राहुल गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दाट वसाहत असलेल्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार जास्त होतो. त्यामुळेच मुंबई आणि दिल्लीतील रुग्ण संख्या जास्त आहे. महाराष्ट्रातील सरकारला आमचा पाठिंबा आहे. पण मोठे निर्णय घेण्याइतके अधिकार काँग्रेसला नाही. असे असले तरी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून मदत मिळायला हवी, असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले.  ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

देशातील कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. यावेळी राहुल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन महिन्यांपूर्वी म्हटले होते की, २१ दिवसात आपण कोरोना व्हायरसचा पराभव करू. पण, आता ६० दिवस झाले आहेत आणि कोरोना व्हायरस देशात झपाट्याने पसरत चालला आहे. लॉकडाउनचे चार टप्पे पूर्ण होत आहेत. पण, पंतप्रधानांना जे अपेक्षित होते, ते परिणाम मिळालेले नाहीत. त्यामुळे आता पुढे सरकार काय करणार आहे. कारण लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरला आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. दरम्यान, महाराष्ट्रातील सरकारला आमचा पाठिंबा आहे. पण मोठे निर्णय घेण्याइतके अधिकार काँग्रेसला नाही. आमच्याकडे पंजाब, छत्तीसगढ व राजस्थानमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे. असे असले तरी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून मदत मिळायला हवी. काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांसंदर्भात बोलताना राहुल गांधी म्हणाले, आमचे सरकार गरिबांना पैसे आणि भोजन देत आहे. आम्हाला माहिती आहे, की पुढे काय करायला हवे. पण राज्ये किती काळ एकटेच लढाई लढतील. केंद्रालाही पुढे यावे लागेल आणि नियोजनासंदर्भात देशाशी बोलावे लागेल,असेही राहुल गांधी म्हणाले.

Exit mobile version