Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केंद्रीय पथकाची डॉ. उल्हास पाटील रूग्णालयास भेट

जळगाव, प्रतिनिधी । येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास आज केंद्रीय पथकाने भेट देऊन याठिकाणी कोरोना रूग्णांवर सुरू असलेल्या उपचाराची माहिती घेतली. रूग्णांवर होणारे उपचार आणि मिळणार्‍या सुविधा पाहुन केंद्रीय पथकाने समाधान व्यक्त केले.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यासोबतच मृत्युदर देखिल वाढला आहे. राज्यात जळगावात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रूग्णांच्या मृत्यूचा दर वाढल्याने त्याची दखल थेट केंद्र सरकारने घेतली आहे. मागील आठवड्यातच डेथ ऑडीट कमिटीचा अहवाल तत्काली जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सादर केला. या अहवालानंतर केंद्र शासनाचे पथक काल दि. २० रोजी जळगावात दाखल झाले. केंद्रीय पथकाचे प्रमुख ओएचएफडब्ल्युचे वरिष्ठ विभागीय संचालक डॉ. ए.जी. अलोने यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट दिली होती. त्यानंतर आज या केंद्रीय पथकाने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास भेट दिली. या भेटीत त्यांनी कोरोना वॉर्डासह संशयित रूग्णांच्या कक्षाची देखिल पाहणी केली. तसेच काही सुचना देखिल त्यांनी केल्या आहे.

यांची होती उपस्थिती
केंद्रीय पथकाचे प्रमुख डॉ. ए.जी. अलोने यांच्यासह डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्विकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रय्या कांते रजीष्ट्रार प्रमोद भिरूड, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नागोराव चव्हाण उपस्थित होते.

Exit mobile version