Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकीही मिळणार

 

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।  केंद्र सरकार थकबाकीसह महागाई भत्ता देण्यासही तयार झालं असल्याचा दावा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या युनियनने केला आहे. 

 

देशातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महागाई भत्त्यासह वाढीव पगार मिळण्याची तारीखही निश्चित झाली आहे. सरकारने महागाई भत्त्यावरील स्थगित उठवण्याचा निर्णयाला संमती दिली असून, कर्मचार्‍यांच्या डीएचा मार्ग मोकळा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे निवृत्तीवेतनधारकांच्या डीआर किंवा महागाई मदत (डीआर) वरील बंदी हटविण्याबाबत करार झाल्याची माहिती केंद्रीय कर्मचारी युनियनचे महासचिव शिव गोपाल मिश्रा यांनी दिली आहे.

 

२६ आणि २७ जूनला दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमध्ये बैठक झाली. या बैठकीला महासचिव शिव गोपाल मिश्रा यांच्यासह केंद्रीय सचिव आणि इतर नेते उपस्थित होते. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या २८ महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. याच बैठकीत केंद्र सरकारने दीड वर्षांपासून स्थगित केलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्ता आणि पेन्शनर्सना देण्यात येणाऱ्या मदतीसंदर्भात चर्चा करण्यात आली.

 

शिव गोपाल मिश्रा म्हणाले, “सरकार सप्टेंबर महिन्यात दोन महिन्यांच्या थकबाकीसह डीए देणार आहे. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या पगारात महागाई भत्ता (डीए) आणि डीआर देण्यास सरकारने सहमती दर्शविली आहे. सरकार केंद्रीय हफ्ते आणि निवृत्तीवेतनधारकांना तीन हफ्त्यांचे डीए आणि डीआर देईल. हे तीन हफ्ते जानेवारी २०२०, जुलै २०२० आणि जानेवारी २०२१ मधील असतील. मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार जुलै आणि ऑगस्ट २०२१ साठी थकबाकीही देण्यात येणार असून, सप्टेंबरमध्ये ही रक्कम कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.

 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यात वाढीव पगार मिळाल्यास निवृत्ती वेतनधारकांना पेन्शन वाढून मिळेल. सध्या असलेल्या नियमानुसार केंद्रीय कर्मचार्‍यांना १७ टक्के दराने डीए मिळतो. तर जानेवारी २०१९ मध्ये तो २१ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला होता. परंतु मागील वर्षी सरकारने डीए आणि डीआरला स्थगिती दिली होती. सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे निश्चित करते. महागाई दरानुसार, डीए जूनमध्ये २४ टक्के आणि डिसेंबर २०२० मध्ये २८ टक्के निश्चित करण्यात आला होता. तर जुलै २०२१ मध्ये तो ३१ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात केंद्रीय कर्मचार्‍यांना ३१ टक्के दराने डीए मिळू शकतो.

 

Exit mobile version