Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कृषी केंद्रावर लागणाऱ्या विक्री बिलबुक उपलब्धतेसाठी तहसीलदारांना निवेदन

रावेर प्रतिनिधी । रावेर शहर व तालुक्यातील कृषी केंद्रावर लागणाऱ्या विक्री बिलबुक रजिस्ट्रर मिळत नसल्याने नोंदणीची समस्या निर्माण झाली आहे. संचारबंदीमुळे प्रिंटींगची कामे थांबली आहे. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढाण्यासाठी रावेर ऍग्रो डिलर्स असोसिएशनतर्फे तहसीलदारांना निवेदन दिले.

संचारबंदीमुळे प्रिंटीगप्रेस बंद
रावेर शहर व तालुक्याभरातील कृषी विक्रेत्यांना येत्या खरीप हंगामात बियाणे, कीटकनाशके, रासायनिक खतांच्या साठा नोंद आणि विक्रीसाठी लागणाऱ्या विक्री बिलबुक रजिस्टर मिळत नसल्याने नोंदीची समस्या निर्माण झाली असल्याने व संचारबंदीमुळे प्रिंटिंग ऑफसेट बंद असल्याने रजिस्टर व इतर कामे बंद आहेत. मात्र खरीप हंगाम तोंडावर असल्याने त्या दृष्टीने तयारीसाठी व नोंदवही प्रमाणित करण्यासाठी साठा रजिस्टर व विक्री बिलबुके मिळण्यास अडचणी येत आहेत.

तहसीलदारांना दिले निवेदन
याबाबत रावेर ऍग्रो डिलर्स असोसिएशनतर्फे रावेर तहसील कार्यालयात तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना या समस्येवर तोडगा काढण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी ऍग्रो डिलर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे, शहराध्यक्ष एकनाथ महाजन, सचिव युवराज महाजन, कृषी विक्रेते चंद्रकांत अग्रवाल उपस्थित होते.

कोट –
खरीप हंगामाच्या दृष्टीने बियाणे लवकरच बाजारात उपलब्ध होणार असून कृषि विभागाकडून साठ्याच्या प्रमाणिकरणासाठी साठा रजिस्टर गरजेचे आहे. मात्र ऑफसेट व छपाई बंद असल्याने अडचणी येत आहेत. याबाबत प्रशासनाने तोडगा काढण्यासाठी तालुका संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले.

– सुनील कोंडे, अध्यक्ष, रावेर तालुका ऍग्रो डिलर्स असो. रावेर

Exit mobile version