Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कृषी कायदे रद्द : केंद्राच्या निर्णयाचा शिवसेनेतर्फे जल्लोषात स्वागत (व्हिडिओ)

जळगाव,प्रतिनिधी | केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द केल्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाचा शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या नेतृत्वाखाली फाटके फोडून व पेढे वाटून स्वागत करण्यात आले.

 

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे लागू केले होते, हे कायदे जाचक असून ते रद्द करण्यात यावी अशी भूमिका दिल्ली येथील आंदोलकांनी घेतली होती. हे तीन कायदे मागे घेण्यात आले आहे. याबाबत बोलतांना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करतांना सांगितले की, आज ऐतिहासिक निर्णय झाला आहे. मोदी सरकारला झुकावे लागले आहे. शेतकरी व जवान हे देशाचा कणा आहे. या शेतकऱ्यांला आपल्या हक्कांसाठी मागील एक वर्षापासून आंदोलन करावे लागले, मात्र हा शेतकरी आपल्या आंदोलनापासून हटला नाही. ज्या ज्या पक्षांनी व संघटनांनी या आंदोलनास साथ दिली त्यांचे आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पाठींबा दिला होता. आजचे यश हे शेतकऱ्यांचा विजय आहे. परंतु, शेतकऱ्यांचे बलिदान झाल्यावरच हा कृषी कायदा रद्द करण्यात आला आहे. आज शेतकऱ्यांचा विजय झाला आहे. आगामी काळात मोदी सरकारने जनतेचे हित लक्षात घेऊन कायदे करावेत. हुकुमशाही जास्त दिवस टिकत नाही, असे निर्णय लादले गेले तर आम्ही हाणूनपाडू, आगामी काळात जनतेचा विचार करूनच निर्णय घेण्यात यावेत. तसेच कंगना याची हार होवून गांधीजींच्या विचारांचा विजय झाला. कंगना यांना पद्मश्री कोणत्या निकषावर देण्यात आले. या वायफळ बोलणाऱ्या कंगना यांना दिलेला पद्मश्री पुरस्कार काढून घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी महानगरप्रमुख शरद तायडे, युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हायुवाधिकारी शिवराज पाटील, युवासेना उपजिल्हायुवाधिकारी पियुष गांधी, युवासेना महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी, युवासेना महानगर युवाधिकारी विशाल वाणी, प्रशांत सुरळकर, विजय बांदल आदी उपस्थित होते.

 

Exit mobile version