Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कृषीदुत दिनेश पाटील यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 

अमळनेर : प्रतिनिधी । तालुक्यातील धार येथे कृषीदुत दिनेश पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत त्यांच्याशी शंकांचे निरसन करणारी चर्चा केली

 

महात्मा फुले कृषी विद्यापीठ  संलग्न गोदावरी फाऊंडेशन संचालित डॉ उल्हास पाटील कृषी महाविद्यालय (जळगाव) येथील कृषीदुत दिनेश पाटील यांनी ग्रामीण कृषीदुत कार्य अनूभव अंतर्गत अभ्यासदौऱ्यात अमळनेर तालुक्यातील धार गावात माती परीक्षण,  कामगंध सापळे लाऊन बोडआळीचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.

 

यावेळी कृषी सहायक एम.  जी.  पवार , प्रगतीशील शेतकरी माधव पाटील , भगवान पाटील , शांताराम पाटील , यशवंत पाटील , शिवाजी पाटील , किशोर पाटील,  सतीश पाटील , संजय पाटील,  हिरामण पाटील,  जगतराव पाटील , राजेंद्र पाटील , गणेश पाटील , संतोष पाटील,  भटु पाटील व इतर गामस्थ उपस्थित होते.  या उपक्रमासाठी डॉ उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य शैलेश तायडे, उपप्राचार्य पी.  एस.  देवरे,  कार्यक्रम अधिकारी प्रा.  बी.  बी.  मुंडे याचे मार्गदर्शन लाभले.

 

Exit mobile version