Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कृषि विभागाच्या उत्कृष्ट लोगो तयार करणाऱ्यास मिळणार एक लाख रुपयांचे पारितोषिक

 

जळगाव (प्रतिनिधी)  कृषी विभागाच्या प्रचलित लोगोमध्ये नजिकच्या काळात बदल प्रस्तावित आहे. सद्या कृषिक्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतक-यांच्या हितासाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याअनुषंगाने प्रचलित लोगोमध्ये बदल करुन नव्याने लोगो करण्याचे प्रस्तावित आहे. कृषि विभागाच्या उत्कृष्ट लोगो तयार करणाऱ्यास एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.

 

 

सदर लोगोमध्ये सुधारणा करुन डी. टी. पी डिझाईनचे सॉफ्ट व हार्ड (रंगीत) कॉपी कृषी माहिती विभाग, कृषि भवन, 2 रा मजला, शिवाजीनगर, पुणे-5 येथे समक्ष व ddinfor@gmail.com या ई-मेलवर दि. 25 मार्च, 2020 पर्यंत पाठविण्यात यावा. उत्कृष्ट लोगो तयार करणा-या व्यक्ती/संस्था/फर्म्स यांना रु. एक लाख रक्कमेचे पारितोषिक देऊन विजेता म्हणून घोषित करण्यात येणार आहे. तथपि, सदर लोगो वापरण्याचे स्वामित्व हक्क कृषि विभागाकडे राहील, याची लोगो तयार करण्यात भाग घेणाऱ्या सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी,

अधिक संपर्कासाठी कृषि उपसंचालक (माहिती), कृषि भवन, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-5 या कार्यालयाच्या कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 020-25537865 तसेच भ्रमणध्वनी 9823356835 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Exit mobile version