Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कृपा करुन त्याला जमिनीतून बाहेर काढा, तो रोज माझ्या स्वप्नात येतोय

vinay bhang

 

भोपाळ (वृत्तसंस्था) कृपा करुन त्याला जमिनीतून बाहेर काढा, तो रोज माझ्या स्वप्नात येतोय, मला त्रास देतोय, असे सांगत एका मुलीने प्रियकराचा मृतदेह तिच्याच खोलीत पुरला असल्याचे त्याच्या आई-वडिलांकडे कबूल केलेय. मध्य प्रदेशच्या सीधी जिल्ह्यातील कामाच गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

 

इन्साथ मोहम्मद असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी इन्साथचा पुरलेला मृतदेह मंगळवारी त्या खोलीतून बाहेर काढला व शवविच्छेदनासाठी पाठव ला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालातूनच इन्साथची हत्या होती की, आत्महत्या हे स्पष्ट होईल. संशयित तरुणी जानू सिंह गोंद सतत जबाब बदलावीत आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी आमचे भांडण झाले. त्यानंतर मीच रशीने गळा आवळून त्याची हत्या केली व मृतदेह माझ्या रुममध्ये पुरला असे जानूने सांगितले. कृपा करुन त्याला बाहेर काढा, तो रोज माझ्या स्वप्नात येतोय” असे तिने त्याच्या आई-वडिलांना सांगितले. दरम्यान, इन्साथ रोज माझ्या स्वप्नात येतोय, त्यामुळे मी हत्येची कबुली देतेय असे तिने इन्साथच्या आई-वडिलांना सांगितले. त्याच्या आई-वडिलांनी सतनामधील राम नगर पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. जानूने पोलिसांसमोर मात्र पलटी मारली. इन्साथने स्वत: आत्महत्या केली. भितीपोटी आपण त्याचा मृतदेह पुरला असे सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

Exit mobile version