Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कृउबा निवडणूकीच्या मेळाव्यात आ. किशोर पाटील साधणार मतदारांशी संवाद

 

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जिल्ह्याभरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा धुराळा उडालेला आहे.  पाचोरा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सदस्य तथा मतदारांशी संवाद साधण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा तालुक्यात स्वतंत्रपणे सहकार मेळाव्यांचे आयोजन केले आहे.

 

 

पाचोरा – भडगाव बाजार समिती मध्ये देखील १८ जागांसाठी तब्बल २३४ इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकला आहे. या पार्श्वभूमीवर २० एप्रिल रोजी होणाऱ्या माघार प्रक्रियेच्यानंतर निवडणूकीचे खरे चित्र समोर येणार असले तरी आतापासूनच आमदार किशोर अप्पा पाटील यांनी निवडणूक तयारीत आघाडी घेतली आहे. दरम्यान याच तयारीचा भाग म्हणून  पाचोरा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सदस्य तथा मतदारांशी संवाद साधण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा तालुक्यात स्वतंत्रपणे सहकार मेळाव्यांचे आयोजन केले आहे. याअंतर्गत ८ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता मोंढाळा रोडवरील तुळजाई जिनिंग येथे सहकार मेळावा होणार आहे. या मेळाव्याला उपस्थित राहावे यासाठी स्वतः आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा तालुक्यातील सर्व सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य यांना लेखी पत्र देत उपस्थिती बाबत आवाहन केले आहे. या मेळाव्यातून मतदार संघातील सहकार चळवळीवर चर्चा विमर्श करून उपस्थितांचे मते जाणून घेतली जाणार आहेत.

Exit mobile version