Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कु-हा-काकोडा येथे कोरोना योद्ध्यांचा समाज गौरव पुरस्काराने सन्मान

मुक्ताईनगर, प्रतिनिधी  ।   आपल्या जीवाची पर्वा न करता कोविड काळात सेवा देणाऱ्या शासकीय कोरोना योद्ध्यांना केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीच्या मुक्ताईनगर तालुका व जळगाव जिल्हा यांच्या वतीने नुकतेच कु-हा-काकोडा येथे समाज गौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

 

कु-हा-काकोडा येथील सरकारी दवाखान्यामधील डॉक्टर्स, नर्सेस व आरोग्य कर्मचारी यांनी पूर्ण दीड वर्षाच्या लॉकडाऊनच्या  कार्यकाळात  कोविड रुग्णांची मनोभावे सेवा केली. याची दखल घेऊन या कोरोना योद्ध्यांना  केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय संघटन सचिव डॉ. शिवचरण उज्जैनकर सर यांनी समाज गौरव पुरस्कार देऊन नुकतेच गौरवले.  याप्रसंगी जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष तथा पंचायत समिती मुक्ताईनगरचे सदस्य  राजेंद्र सवळे, जळगाव जिल्हा सचिव  विनोद पाटील, मुक्ताईनगर तालुका कार्याध्यक्ष संदीप गोंधळी, कोषाध्यक्ष किशोर कासार, सह सचिव वैद्य अनंता सोनार ,कार्यालयीन सचिव विजय गोरले, संघटन सचिव विनोद चव्हाण आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी सर्व आरोग्य कर्मचारी बांधवांच्या कार्याचे मनापासून अभिनंदन केले. याप्रसंगी एकूण १५ कर्मचाऱ्यांना पुरस्कृत करण्यात आले

 

Exit mobile version