Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कुसूंबा येथील सलून दुकानदाराचे घर फोडले; रोकडसह 50 हजारांचा ऐवज लंपास

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुसूंबा येथे बाहेरगावी गेलेल्या मुरलीधर नारायण सुरळकर वय 38 या सलून दुकानदाराचे बंद घर लक्ष करुन चोरट्यांनी 20 हजार तसेच 30 हजार 500 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिणे असा ऐवज लांबविल्याची घटना शनिवारी समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कुसूंबा येथे कविता वेअर शॉपच्या मागील बाजूस मुरलीधर सुरळकर हे पत्नी, मंगला व दोन मुले यांच्यासह राहतात. 24 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मुरलीधर सुरळकर हे पत्नी व मुलांसह बुलढाणा येथे सासरवाडीला गेले होते. 28 रोजी सायंकाळी कुटुंब परतले. यावेळी सुरळकर यांना समोरील दरवाजाचे कुलूप तुटलेले तर दरवाजा उघडा तसेच घरातील कपाट उघडलेले व त्यातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला.

चोरीची खात्री झाल्यावर घरात तपासणी केली असता, घरातील 20 हजार रुपयांची रोकड, 6 ग्रॅम 18 हजार रुपयांच्या सोन्याच्या कानातल्या बाहया, 3 ग्रॅम 9 हजारांचे सोन्याचे कानातील टोंगल, 5 भाराचे 2 हजार रुपयांचे चांदीचे पायातील बाह, व 15 हजार रुपयांचे 4 भाराच्या चांदीच्या पायातील चैन असा एकूण 50 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी 29 रोजी मुरलीधर सुरळकर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून त्यावरुन एमआयडीसी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक संतोष सोनवणे, सिद्धेश्वर दापकर करीत आहे

Exit mobile version