Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कुसुंबा येथे जुगार खेळणाऱ्या तिघांवर पोलीसांची कारवाई

crime 7 1

crime 7 1

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा गावात अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या तिघांवर पोलीसांनी छापा टाकत पत्ते, जुगाराची साधने व साहित्य हस्तगत केले. तिघांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील कुसुंबा येथील देवा सायकल मार्टजवळ बेकायदेशीर पत्त्याचा झन्ना मन्ना जुगार खेळत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी रविवारी १९ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास कारवाई करत संशयित आरोपी एकनाथ रामा कोळी (वय-३२), सुभाष श्रीपद दांडगे, (वय-४२), किशोर सुकदेव हटकर (वय-३८) सर्व रा. कसूबा ता.जि. जळगाव यांना ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यातील पत्ते, जुगाराची साधने व साहित्य असा ५७० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी पोकॉ निलेश पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version