Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कुसुंबा येथील शेतातील गवताला आग; महापालिका बंबामुळे आग आटोक्यात

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव विमानतळाच्या पुढे कुसुंबा गावाजवळील एका शेतातील गवताला अचानक आग लागल्याची घटना आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. यात एका कुटुंबाची झोपडी जळून खाक झाली आहे. महापालिकेच्या बंबाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

 

यासंदर्भात माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील विमानतळाच्या पुढे असलेल्या एका पेट्रोल पंपाच्या मागच्या बाजूला असलेल्या शेतातील गवताला अचानक लाग लागल्याची घटना बुधवार २ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. या संदर्भात जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले. अवघ्या २० मिनीटात बंब घटनास्थळी पोहचला आणि ही आग विझविण्यात आली. यावेळी या शेतात  विलास पावरी (बारेला) कुटुंबिय वास्तव्याला आहे. कुटुंबिय राहत असलेल्या झोपडी देखील आगीत जळून खाक झाली आहे. त्या बारेला कुटुंबियाचे संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याचे समोर आले आहे. अग्निशमन विभागाचे पथकाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आहे. यासाठी अग्निशमन बंबाचे  वाहन चालक वसंत न्हावी, भगवान जाधव, रविंद्र बोरसे, नितीन बारी यांनी परिश्रम घेतले. या संदर्भात अद्यापपर्यंत पोलीसात नोंद करण्यात आलेली नाही.

Exit mobile version