Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कुऱ्हाडदे शिवारातील शेतात रंगलेला जुगाराचा डाव पोलिसांनी उधळला; १५ जणांवर गुन्हा

crime 7 1

crime 7 1

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या लॉकडाऊन काळात शेतात रंगलेला जुगाराचा डाव एमआयडीसी पोलिसांनी उधळुन लावला. पोलीसांनी केलेल्या करवाईत १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

जुगार खेळत असलेले शिवसेनेचे पं.स. सभापती नंदलाल शांताराम पाटील (वय ४५) यांच्यासह माजी उपससभापती धोंडु शामराव जगताप (वय ४८) यांना अटक करण्यात आली आहे. रविवारी दुपारी चार वाजता तालुक्यातील कुऱ्हाडदे शिवारातील एस.पी.पाटील यांच्या शेतात ही कारवाई करण्यात आली. लॉकडाऊन काळात जमावबंदी, संचारबंदी लागु करण्यात आली आहे. अशात सत्ताधारी पक्षातील जिल्हा परिषदेचे पदाधिकारी गावकऱ्यांसह शेतात जुगार खेळत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक विनयाक लोकरे, पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, जितेंद्र राठाेड, प्रकाश पवार, हेमंत पाटील यांच्या पथकाने शेतात धाव घेतली. या शेतातून एकुण १६ जणांना जुगार खेळतांना अटक करण्यात आली. यात पंचायत समिती सभापती नंदलाल पाटील व माजी सभापती धोंडु जगताप हे देखील मिळुन आले. नंदलाल पाटील यांनी घटनास्थळावरुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला. परंतू, पोलिसांनी राजकीय दबाव झुगारुन अखेर पाटील यांना देखील अटक केली. या १६ जणांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे संपुर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. या जुगारींकडून जुगाराच्या साहित्यासह ३१ हजार ४०० रुपयांचे जप्त करण्यात आले आहेत.

यांच्यावर केली कारवाई
मनोज रामकृष्ण बारी (वय ३९), कृष्णा राजु सोनवणे (२२), राहुल राजेंद्र ताडे (२२), भुषण लोटु खलसे (२४), सचिन बाळु बारी (२१), विनोद लक्ष्मण मोरे (२४), सुनिल शंकर काटोले (४६), बापु सिताराम महाजन (४२), शिवाजी हरी बारी (४५), शिवदास उत्तम बारी (३८), नंदलाल शांताराम पाटील (४५), राहुल कृषा बारी (३३), महेश विक्रम महाजन (२४, सर्व रा.इंदिरानगर, शिरसोली), धोंडु शांताराम जगताप (वय ४८, रा.बिलवाडी) व गोरख रामसिंग केदारे (वय ५१, रा.दापोरा)

Exit mobile version