Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कुरीयर दुकानातील २४ हजार किमतीचे पार्सल चोरट्यांनी लांबविले ; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 

जळगाव प्रतिनिधी । नवीपेठेतील डीटीडीसी कुरीयरचे २४ हजार ३१५ रूपये किंमतीचा कार्टून अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील नवीपेठेत डीटीडिसी कुरीअर नावाचे दुकान आहे. या दुकानात वाहनाद्वारे आलेले पार्सल ने-आण करण्याचे काम करतात. १९ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० ते ६.३० वाजेदरम्यान अज्ञात व्यक्तीने दुकानाच्या बाजूला ठेवलेले २४ हजार ३१५ रूपये किंमतीचा प्लास्टीकचे कव्हरमध्ये गुंडाळलेले ऑईल पॉकिंगचे मटेरीयल चोरून नेल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात माल वाहतूकदार अफजल खान हमीद (वय-४२) रा. भुसावळ यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीलतपास पोलीस नाईक गणेश पाटील करीत आहे.

Exit mobile version